

Pune Rain: Madhe Ghat Road Collapse Cuts Off 13 Villages
esakal
वेल्हे : पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यातील प्रसिद्ध मढेघाट धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गावरील केळद खिंडीत रस्त्याला मोठी आडवी भेग पडून तो खचल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा मार्ग दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद केला आहे. या घटनेमुळे केळद तसेच मढेघाट परिसराकडे वाहनाने जाणे अशक्य झाले असून परिसरातील १३ गावांचा वाहतुकीचा संपर्क तुटल्याची माहिती राजगड तालुक्याचे तहसीलदार निवास ढाणे यांनी दिली.