

Pune Weather Update
Sakal
पुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रभाव वाढल्यामुळे मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी थंडी कायम आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरात गुरुवार (ता. ४) ते रविवार (ता. ७) दरम्यान किमान तापमान १२ ते ११ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. त्यानंतर सोमवारपासून (ता. ८) पुढील दोन दिवस किमान तापमानात घट होऊन ते १० अंश सेल्सिअस होण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.