
Maharashtra Weather
Sakal
पुणे : महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून मॉन्सून परतला आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम असताना, पावसासाठी पोषक हवामान आहे. उद्या (ता. १६) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विजांसह पावसाची श क्यता असल्याने दक्षतेचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.