बायकोला घाबरुन पासपोर्टची पानं फाडली; थायलंड ट्रीप लपवणं पडलं महागात

passport
passportसकाळ

मुंबई - लग्नपूर्वीच्या केलेल्या कारनाम्यांचा लग्न झाल्यावर आयुष्यावर परिणाम होऊ नये म्हणून अनेकजण काळजी घेतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भूतकाळाविषयी आपल्या पार्टनरला काहीही न सांगितलेलंच बर असं अनेकांना वाटतं. मात्र पुण्यातील एका तरुणाला बायकोपासून ट्रॅव्हल हिंस्ट्री लपविण्याचा प्रयत्न केला. मात्र अस करणं त्याला चांगलच महागात पडल असून त्याला जेलची हवा खावी लागली. (Pune man arrsted for hiding travel history )

passport
शिवसेनेचा सावंतांना मोठा धक्का; सोलापूरच्या जिल्हा संपर्क पदावरून केली हकालपट्टी

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका व्यक्तीला त्याच्या पासपोर्टमधील पाने गहाळ झाल्याप्रकरणी तपासणी अधिकाऱ्यांनी अडवलं होतं. त्यावर संधयित व्यक्तीने आपण ती पाने नष्ट केल्याचं म्हटलं होतं. समदर्शी यादव (30) अस त्या व्यक्तीचं नाव असून त्याला गुरुवारी मालदीवच्या फ्लाईटमध्ये चढण्यापासून रोखण्यात आलं होतं.

सहार पोलिसांनी समदर्शी यादव याला अटक केली आहे. 2019 मध्ये लग्न करण्यापूर्वी समदर्शी यादवने त्याच्या बायकोपासून ट्रॅव्हल हिस्ट्री लपविण्यासाठी पासपोर्टमधील किमान 10 पाने फाडली होती. समदर्शीने 2019 मध्ये पासपोर्टमधील पेज क्रमांक 3 ते 6 आणि 31 ते 34 ही पाने नष्ट केली. त्यामध्ये तो थायलंडला गेल्याची नोंद होती.

passport
फरारी उद्योगपती विजय माल्याबाबत सुप्रीम कोर्टाचा 11 तारखेला निर्णय

अटकेनंतर समदर्शीला शुक्रवारी अंधेरी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर कऱण्यात आलं. त्यानंतर 25 हजारांच्या जामिनावर त्याची सुटका करण्यात आली. यादव याच्यावर आयपीसीच्या कलम 420, 465, 468 आणि 471 नुसार खोटे कागदपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड वापरणे आणि पासपोर्ट कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com