
मॅट्रिमोनी साइटवर ओळख झाल्यानंतर तरुणाने तरुणीला लग्नाचं आमिष दाखवलं. तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्यानंतर लग्नाला नकार दिला. इतकंच नाही तर तिचे फोटो-व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत पैसेही उकळले. या प्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित तरुणी पुण्यातील असून आरोपी तरुण सोलापूर जिल्ह्यातला असल्याची माहिती समोर आलीय.