पुण्यात 'एलियन' असल्याचा दावा; पीएमओकडून दखल (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

कोथरूड येथील एका सोसायटीत राहणाऱ्या 47 वर्षीय व्यक्तीला त्यांच्या फ्लॅटच्या खिडकीतून समोरच्या झाडींमध्ये मध्यरात्री संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे दिसले. ही हालचाल परग्रहावरील एलियनचीच असावी आणि ते आपल्या पृथ्वीचे फोटो आणि गोपनिय माहिती परग्रहावर पाठवत आहेत. यामुळे आपल्या राष्ट्राला धोका आहे असा त्यांचा ठाम समज झाला.

पुणे : पुणेकरांची जगभर त्यांच्या वागणुकीमुळे चर्चा होत असते, आतातर चक्क पुण्यातील एका नागरिकाने शहरात एलियन फिरत असल्याची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयाकडे (पीएमओ) केली अन् पीएमओनेही त्याची दखल घेत पुणे पोलिसांना चौकशीचे आदेश दिले.

पुण्यात एलियनचा वावर असून, ते पृथ्वीवरील गोपनीय माहिती परग्रहावर पाठवत आहेत, अशी तक्रार एका पुणेकराने पोलिसांकडे नाही तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयाकडे केली. पंतप्रधान कार्यालयानेही याची गंभीर दखल घेऊन पोलिसांना तपासाचे आदेश दिले. पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तक्रारदाराला शोधून काढले. त्याच्याकडे चौकशी केली असता, मानसिक रूग्णाने रात्रीच्या अंधारात चमकणाऱ्या लाईटला एलियन समजून ही तक्रार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारावर आता पडदा पडला तरी हे एलियन पुराण पुण्यात चर्चेचा विषय बनला आहे.

कोथरूड येथील एका सोसायटीत राहणाऱ्या 47 वर्षीय व्यक्तीला त्यांच्या फ्लॅटच्या खिडकीतून समोरच्या झाडींमध्ये मध्यरात्री संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे दिसले. ही हालचाल परग्रहावरील एलियनचीच असावी आणि ते आपल्या पृथ्वीचे फोटो आणि गोपनिय माहिती परग्रहावर पाठवत आहेत. यामुळे आपल्या राष्ट्राला धोका आहे असा त्यांचा ठाम समज झाला. देशाच्या काळजीपोटी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ईमेलद्वारे तक्रार करून कारवाईची मागणी केली. पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेत पुणे पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले. पंतप्रधान कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी पोलिस आले आहेत हे ऐकुनच त्यांच्या कुटूंबीयांना धक्काच बसला. काही वर्षांपूर्वी तक्रारदार यांना ब्रेम हँब्रेज झाल्याने त्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याने उपचारही सुरू आहेत.

Web Title: Pune Man Sees Alien Outside Home Writes to PMO for Probe