
पुणेकराचं थेट फायझर प्रमुखांना पत्र
लसीच्या तुटवड्यामुळे देशात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. देशात सध्या कोव्हॅक्सिन, कोवीशिल्ड आणि स्पुटनिक या लसी उपलब्ध आहेत. मात्र, लसींचा साठा पुरेसा नसल्यामुळे लसीकरण ठप्प आहे. अशा परिस्थिती पुण्यातील एका तरुणानं अमेरिकेतील फायझर कंपनीच्या सीईओ यांना पत्र लिहिलं आहे. अमेरिकेतील फायझर कंपनीची कोरोनावरील लस पुण्यात कधी उपलब्ध होणार असा प्रश्न, आपल्या पत्रात पुणेकराने थेट फायझर कंपनीच्या प्रमुखांनाच विचारला. पुणेकराच्या पत्रावर फायझरच्या सीईओ यांनीही 24 तासांच्या आत उत्तर पाठवले. (Pune man writes to Pfizer CEO asking for Covid vaccine in India, gets immediate response)
पुण्यातील प्रकाश मीरपुरी यांनी फायझरचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोर्ला यांना ईमेलद्वारे पत्र लिहिलं. भारतात लस उपलब्ध होईल का? अशी विचारणा प्रकाश यांनी आपल्या पत्राद्वारे केली. प्रकाश यांच्या या प्रश्नावर अल्बर्ट बोर्ला यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
हेही वाचा: फायझर ५ कोटी लसीचे डोस देण्यास तयार; भारतासमोर ठेवल्या अटी
नियमांनुसार फायझरची लस लवकरच भारतात देण्यात येईल असे बोर्ला यांनी प्रकाश यांना उत्तर देताना म्हटलं आहे. अद्याप आमच्याकडे भारतात लस पुरवठा करण्यासाठी नियामक मान्यता नाही. लसीकरण कार्यक्रमासाठी आमची लस उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही सरकारशी करार करण्यासाठी जे काही करता येईल ते करत आहोत, असे बोर्ला यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

एका पुणेकराच्या (प्रकाश मिरपुरी) पत्राला फायझरने तातडीने उत्तर का द्यावे? याचे कारण की, या पुणेकराकडे फायझर कंपनीचे समभाग (शेयर्स) आहेत. आपल्या ‘शेयरहोल्डर’च्या शंकेचे समाधन करण्याची तत्परता अमेरिकी कंपनीने दाखवली.
Web Title: Pune Man Writes Pfizer Ceo Covid Vaccine India
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..