Pune Trafficesakal
पुणे
Pune Traffic: गणेशोत्सवापूर्वी पुणेकरांना मोठा दिलासा! मंडई घेणार मोकळा श्वास! तीन वर्षांपासून लावलेले बॅरिकेड्स हटवणार
New Entry Gate at Mandai Metro Station Opens: महा मेट्रोने मंडई स्थानकाच्या नव्या प्रवेशद्वाराचे काम पूर्ण केले, वाहतूक कोंडी कमी होणार, पण दुकानांचे बांधकाम अद्याप प्रलंबित.
पुण्यातील मंडई परिसरातील वाहतूक कोंडी आणि गैरसोयीच्या समस्यांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. महा मेट्रोने मंडई मेट्रो स्थानकाच्या नव्या प्रवेशद्वाराचे बांधकाम पूर्ण केले असून, गेल्या तीन वर्षांपासून परिसरात असलेले बॅरिकेड्स हटवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे मंडई परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. मात्र, स्थानिक व्यापाऱ्यांसाठी दुकानांचे बांधकाम अद्याप सुरू असल्याने काही भागात बॅरिकेड्स कायम आहेत.