railway
sakal
पुणे - पुणे- मनमाड लोहमार्ग हा व्यस्त मार्ग असून, यावरून प्रवासी व माल वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. परिणामी रुळांची झीज लवकर होते. हे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने आता त्या मार्गावर ५५० जीएमटी (ग्रॉस मिलियन टन) क्षमतेचे नवीन रूळ टाकण्याचे काम सुरू केले आहे.