Pune : चालण्याला द्यावी हाईकिंगची जोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

working out

Pune : चालण्याला द्यावी हाईकिंगची जोड

वर्क आऊटचा अर्थात व्यायामाचा सर्वांत सोपा प्रकार कोणता असेल तर तो म्हणजे चालणे. त्यामुळे तुम्हाला तंदुरुस्त होता येते. जिम किंवा एरोबिक्स क्लासमध्ये व्यायाम करून तुम्हाला काहीसे अस्वस्थ वाटू शकते, जे चालण्यात होत नाही.

तुम्ही चालण्याचे अंतर किंवा स्टेप्सच्या संख्येत टप्प्याटप्प्याने वाढ करा. व्यायामाच्या शरिरशास्त्राचे हे मूलभूत तत्त्व आहे. यास प्रगमनशील अर्थात उत्तरोत्तर वाढणारा भार (प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड) असे संबोधले जाते. आणखी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास तुम्ही शरीरावरील भार छोट्या हप्त्यात वाढवीत न्या, जेणेकरून तुमच्या शरीराला त्याची सवय होत जाईल.

तुम्ही ताठ स्थितीत चालायला हवे. साधारण २० मीटर पुढे नजर ठेवा. कोपर अंगाजवळ ठेवा आणि योग्य कोन साधा. हात वर नेताना खांद्यापर्यंत आणि खाली नेताना कंबरेपर्यंत असावेत. पाय अकारण पुढे पडणार नाही याची दक्षता घ्या.

तुमच्या शूज आरामदायक असाव्या. टाचेपाशी पुरेसे कुशनिंग आहे याची खात्री करा. बोटांचा भाग रुंद असावा, तसेच घोट्याच्या वरील भागाचे कुशनिंग सुद्धा चांगले असावे. संध्याकाळच्या वेळी शूज खरेदी करा. याचे कारण दिवसभराच्या धावपळीनंतर तुमचा पाय काहीसा सुजलेला असतो. त्यामुळे शूजचा आकार अचूक कळणे शक्य होते.

तुम्ही मोकळ्या जागेत जास्त अंतरासाठी चाला. यास हाईकिंग असे म्हणतात. त्यामुळे तुमच्या चालण्याची क्षमता लक्षणीयरित्या वाढू शकेल. हाईकिंगला जाताना पाणी आणि खाद्यपदार्थ बरोबर नेण्यास विसरू नका.

हे लक्षात ठेवा

आदल्या दिवसाच्या व्यायामातून तुमचे शरीर

कसे सावरले आहे याचा

रोज आढावा घ्या

तुमची झोप व्यवस्थित झाली आहे याची खात्री करा

तुमच्यावरील एकूण तणावाच्या पातळीचा आढावा घ्या

काहीसा ताण जाणवला किंवा खूप ऊर्जा असल्यासारखे वाटले तर चालण्याचा कालावधी त्यानुसार कमी-जास्त करा

आम्ही एक तारखेला छापलेल्या कॅलेंडरनुसार प्रगतीचा आढावा घ्या