मार्केट यार्ड - कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणेचे सभापती दिलीप काशिनाथ काळभोर यांनी आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे (ग्रामीण) यांच्याकडे सोमवारी, (ता. ७) राजीनामा सादर करण्यात आला. काळभोर यांची सभापतीपदी निवड ता. ८ एप्रिल २०२२ रोजी झाली होती.