मार्केट यार्ड - बाजार समितीने जेवढे विना निविदा टेंडर दिले आहेत ते सर्व टेंडर रद्द करण्यात येतील. तसेच यासाठी सखोल उच्चस्तरीय समिती नेमून दोन महिन्यात चौकशी पुर्ण करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल अशी घोषणा पणनमंत्री जयकुमार रावल यांनी विधानपरिषदेत केली.