मार्केट यार्डात शुकशुकाट
मार्केट यार्ड, ता. २९ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे पुणे मार्केट यार्ड परिसरात व्यापारी, शेतकरी आणि बाजाराशी संबंधित घटकांनी तीव्र दुःख व्यक्त करत बुधवारी व गुरुवारी मार्केट यार्डमधील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.
दि पूना मर्चंट्स चेंबर, हमाल पंचायत आणि ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, अडते असोसिएशन आदी संघटनांनी संपूर्ण बाजार बंद पाळला. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या मुख्य बाजार आवारातील फळे-भाजीपाला विभाग, पान बाजार, केळी बाजार, गुरांचा बाजार, फुलांचा बाजार, भुईकाटा केंद्र, पेट्रोल पंप विभाग तसेच मोशी, उत्तमनगर, मांजरी आणि खडकी येथील उपबाजारही बंद होते. बुधवारी बाजार समितीचे मुख्य कार्यालयदेखील बंद ठेवण्यात आले होते.
आज पुणे मार्केट यार्ड पूर्ववत
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारातील सर्व व्यवहार शुक्रवारी (ता. ३०) पूर्ववत होणार आहेत. फळे-भाजीपाला विभाग, पान बाजार, केळी बाजार, गुरांचा बाजार, फुलांचा बाजार, भुईकाटा केंद्र तसेच पेट्रोल पंप विभागातील व्यवहार नियमित वेळेत सुरू होणार आहेत. यासोबतच मोशी, उत्तमनगर, मांजरी आणि खडकी येथील उपबाजारांमधील व्यवहारही नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

