Pune Markets: दिवाळीनिमित्त व्यापारी पेठा गजबजल्या ;नवीन खतावण्यांची खरेदी; विविध दुकानांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई

Pune Markets Diwali Shopping : दिवाळीनिमित्त गुलटेकडी मार्केट यार्डासह पुण्यातील व्यापारी पेठा विद्युत रोषणाईने सजल्या आहेत. लक्ष्मीपूजनासाठी व्यापाऱ्यांनी नवीन खतावण्या, चोपड्या, चांदीची नाणी आणि पूजासाहित्याची खरेदी करून तयारी पूर्ण केली आहे.
Pune traders decorate their shops and prepare for Lakshmi Puja with new account books and silver coins.

Pune traders decorate their shops and prepare for Lakshmi Puja with new account books and silver coins.

esakal

Updated on: 

मार्केट यार्ड, : आकर्षक विद्युत रोषणाईने उजळलेली दुकाने, स्वच्छतेसह रंगरंगोटीने सजलेले व्यापारी गाळे आणि लक्ष्मीपूजनाच्या साहित्य खरेदीची लगबग असे उत्साहाचे वातावरण गुलटेकडी मार्केट यार्डासह शहरातील बाजारपेठांत पाहायला मिळत आहे. लक्ष्मीपूजनासाठी व्यापाऱ्यांची जय्यत तयारी सुरू असून, रविवारी (ता. ८) शुभमुहूर्तावर धनलक्ष्मीची पूजा केली जाणार आहे. व्यापारात भरभराट, आर्थिक समृद्धी आणि नव्या वर्षात व्यवसायवृद्धीच्या अपेक्षेने व्यापारी वर्ग सज्ज झाला आहे.

Loading content, please wait...