Police Commissioner Ritesh Kumar
Police Commissioner Ritesh Kumarsakal

Ritesh Kumar : माथाडींच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्यांना ठेचून काढा

माथाडींच्या नावाखाली व्यापारी आणि उद्योजकांकडून खंडणी वसूल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत.
Summary

माथाडींच्या नावाखाली व्यापारी आणि उद्योजकांकडून खंडणी वसूल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पुणे - माथाडींच्या नावाखाली व्यापारी आणि उद्योजकांकडून खंडणी वसूल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

गुन्हेगारीमुळे पुण्यातून सहा हजार कोटींचा प्रकल्प कर्नाटकात गेला. त्यामुळे खंडणीखोरांना ठेचून काढा अन्यक्षा तुमच्यावरच कारवाई होइल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हेगार आणि खंडणीबहाद्दरांविरोधात कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे.

औद्योगिक कंपन्या, आयटी कंपन्या, व्यापारी संघटना, चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज, अ‍ॅग्रीकल्चर संघटनांचे उद्योजक प्रतिनिधींची बैठक पोलिस आयुक्तालयात बुधवारी पार पडली. गुन्हेगारी टोळ्या अनधिकृत माथाडी संघटना आणि माथाडींच्या नावाखाली व्यापारी, उद्योजकांना त्रास देत आहेत. हा त्रास होऊ नये, या उद्देशाने पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी स्वत: ही बैठक बोलावली होती.

यासोबतच नोकरदार महिलांची सुरक्षिततेबाबत विशाखा कमिटी, वाहतूक समस्या आणि सरकारी खात्यांबाबत प्राप्त तक्रारींबाबत बैठकीत चर्चा झाली. शहरात गुन्हेगारी टोळ्यांमार्फत खंडणी वसुली, तसेच काही माथाडी कामगारांकडून अवास्तव पैशांची मागणी केली जाते. वर्गणीच्या नावावर खंडणी मागितली जाते, यावर आळा घालावा. माथाडी कामगारांचे मजुरीचे दर जाहीर करावेत. वाहतूक समस्येबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनांच्या प्रतिनिधींनी केली.

त्यावर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी व्यापारी, उद्योजकांना खंडणी मागणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल. याबाबत संबंधित पोलिस उपायुक्त आणि पोलिस ठाण्यांनी उचित कारवाई करावी. तसेच, वाहतूक समस्यांबाबत कंपन्यांशी संपर्क साधून ट्रॅफिक वार्डनची संख्या वाढवावी, असे निर्देश वाहतूक पोलिस उपायुक्तांना दिले.बैठकीत माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार मंडळाचे निरीक्षक राजेश मते यांनी माथाडी कामगार कायद्यातील तरतुदींबाबत माहिती दिली. माथाडी कामगार मंडळाकडे तक्रारी द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीस पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

न घाबरता तक्रार द्यावी

बैठकीस उपस्थित व्यावसायिक, उद्योजकांना सर्व पोलिस उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक दिले आहेत. तक्रारदारांनी न घाबरता तक्रार द्यावी. परंतु ते शक्य नसल्यास समक्ष भेटून तक्रार द्यावी. वाहतूक समस्येबाबत स्वतंत्र बैठक बोलावून तोडगा काढण्यात येईल, असे सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com