

Pune Mayor Race Heats Up Ahead Of Reservation Announcement
Esakal
पुणे, ता. १७ : महापालिकेत भाजपला बहुमत मिळाल्याने आता महापौरपद मिळविण्यासाठी अनेक दावेदारांनी गुडघ्याला बाशिंग बांधलेले आहे. मागील पंचवार्षिक काळात हे पद खुल्या गटासाठी राखीव होते. त्यामुळे या पंचवार्षिक कार्यकाळात खुला गट सोडून अनुसूचित जातीच्या महिलेसाठी अथवा इतर मागासवर्गीय गटाचे आरक्षण पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इच्छुकांची संख्या जास्त असल्याने आपल्यावर आरक्षणामुळे गदा येऊ नये, यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.