Pune Crime: मकोका गुन्ह्यातील फरार गुन्हेगारास डेक्कन चौपाटी परिसरातून अटक

MCOCA Accused Arrested in Pune : मकोका आणि आर्म ॲक्टअंतर्गत दाखल गुन्ह्यात सात महिन्यांपासून फरार असलेल्या मनीष गंगावणे याला पुणे गुन्हे शाखेने डेक्कन चौपाटी परिसरातून अटक केली. शेलार मामा चौकाजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
Pune Crime Branch arrests a fugitive accused in an MCOCA case near Deccan Chowpatty.

Pune Crime Branch arrests a fugitive accused in an MCOCA case near Deccan Chowpatty.

esakal

Updated on: 

पुणे: संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात गेल्या सात महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या फरार आरोपीला पुणे गुन्हे शाखा युनिट- तीनच्या पथकाने अटक केली.

डेक्कन परिसरातील शेलार मामा चौकाजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. मनीष शांताराम गंगावणे (वय ३०, रा. वारजे माळवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, आर्म ॲक्ट आणि 'मकोका' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Loading content, please wait...