पुणे : स्व. मातोश्री पदमावती (अम्मा)कृष्णा शेट्टी यांच्या स्मरणार्थ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 स्व. मातोश्री पदमावती (अम्मा) कृष्णा शेट्टी यांच्या आठवे पुण्यस्मरण दिन

पुणे : स्व. मातोश्री पदमावती (अम्मा)कृष्णा शेट्टी यांच्या स्मरणार्थ

कॅन्टोन्मेंट: भक्तिगीते , भजनांचे स्वर आणि आस्थेने विचारपूस करणारे लोकं आणि  भोजनासाठी प्रेमाचा आग्रह यामुळे अंध -अपंग वृद्ध महिला आश्रमातील भगिनी काही क्षण गहिवरल्या आणि सामाजिक दायित्वाचे कर्तव्य पार पडणाऱ्या संयोजकांना भरभरून आशीर्वाद दिला.

निमित्त होते ,स्व. मातोश्री पदमावती (अम्मा) कृष्णा शेट्टी यांच्या आठवे पुण्यस्मरण दिन व मातृदिनानिमित्त खडकवासला येथील नांदेड फाटा येथील शिर्डी साईबाबा अंध -अपंग वृद्ध महिला आश्रमात स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, राष्ट्रवादीचे पुणे शहर उपाध्यक्ष व पद्माकृष्णा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सदानंद शेट्टी, माजी नगरसेविका सुजाता सदानंद शेट्टी यांनी आयोजित केलेल्या खास भक्तीगीतांच्या कार्यक्रमासह भोजन कार्यक्रमाचे.

आर्थिक दुर्बल आणि गरजू घटकांसाठी भरीव योगदान देणाऱ्या स्व. मातोश्री पदमावती (अम्मा) कृष्णा शेट्टी यांच्या आठवे स्मृतिदिनानिमित्त समस्त शेट्टी परिवाराने वृद्ध अपंग - अंध महिलांसाठी हा विशेष कार्यक्रम घेतला. यावेळी उमा शेट्टी, सदाशिव शेट्टी, रोहन शेट्टी, रोशन शेट्टी ,सर्व शेट्टी परिवार, सदानंद शेट्टी मित्रपरिवार,अश्विनी महिला विकास संस्था, अश्विनी मित्र मंडळ,एक्सटसी एंटरटेनमेंट आणि पद्माकृष्णा फाउंडेशनचे विश्वस्त, पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Pune Memory Matoshri Padmavati Krishna Shetty

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewspuneSakale sakal
go to top