Pune Metro
Sakal
पुणे
Pune Metro : मेट्रोला एकाच दिवसात मिळाले ६ लाख प्रवासी; गणेशोत्सवाच्या १० दिवसांत तब्बल ४० लाख पुणेकरांनी केला मेट्रोतून प्रवास
Ganesh Festival 2025 : अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुणे मेट्रोने विक्रमी ६ लाख प्रवाशांची ने-आण केली, तर संपूर्ण गणेशोत्सवात तब्बल ४० लाख प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला.
पुणे : शहरची उपनगरे आणि पिंपरी चिंचवडमधील रहिवाशांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे अनंत चर्तुदर्शीच्या दिवशी (शनिवारी) सुमारे ६ लाख प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला. मेट्रोने पहिल्यांदाच शहरात एकाच दिवशी एवढी मोठी प्रवासी संख्या अनुभवली. तर पूर्ण उत्सवात सुमारे ४० लाख प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला.

