
पुणे शहर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाच्या तडाख्यात आहे. रस्त्यांवर साचलेले पाणी आणि मेट्रोच्या कामामुळे पडलेला राडारोडा यामुळे पुणेकरांचे हाल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर, पालकमंत्री अजित पवार यांनी मेट्रो अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. वाहतूक विभागाच्या बैठकीत त्यांनी मेट्रोच्या राडारोड्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीत वाढ झाल्याचा ठपका ठेवला.
“दोन दिवसांत मेट्रो परिसरातील राडारोडा हटवला नाही, तर दंडात्मक कारवाई केली जाईल,” असा कडक इशारा त्यांनी दिला. विशेष म्हणजे, हिंजवडी टाटा मेट्रोच्या अडथळ्यांबाबतही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “सोमवारपर्यंत हिंजवडी मेट्रोचे अडथळे दूर न केल्यास पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (PMRDA) 10 कोटी रुपयांची दंडाची नोटीस पाठवली जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.