Cm Devendra Fadnavis
sakal
पुणे - पुणे मेट्रोचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. देशातील गतिमान मेट्रो प्रकल्पाच्या यादीत पुणे मेट्रोचादेखील समावेश आहे. पुण्यात सध्या ३३ किलोमीटरच्या मार्गावर मेट्रो धावत आहे. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे पण शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता, प्रवाशांच्या सोयीसाठी व वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आगामी काळात पुणे मेट्रोचा विस्तार हा २०० किलोमीटरवर केला जाणार आहे. यापैकी ८० किलोमीटरचा मार्ग प्रस्तावित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.