Pune Metro: पुणे मेट्रोचा विस्तार डोणजे, लोणीकंद ते खेड शिवापूरपर्यंत; प्रस्ताव मंजूर

Pune Metro:  पुणे मेट्रोचा विस्तार डोणजे, लोणीकंद ते खेड शिवापूरपर्यंत; प्रस्ताव मंजूर
Updated on

Pune Latest News: पुण्यात मेट्रोचे अवघे दोन मार्ग सुरु झाले आहेत, उर्वरित सर्व मार्ग मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. असे असताना पुणे महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांनी मेट्रो सेवा शहराच्या हद्दीच्या बाहेर न्यावी यासाठी उपसूचना देऊन प्रस्ताव मंजूर करून घेतले आहेत. यामध्ये कात्रज ते खेड शिवापूर टोलनाका, खडकवासला ते डोणजे, वाघोली ते लोणीकंद आणि कात्रज ते उंड्री असे मेट्रोच्या विस्तारीकरणाचे चार प्रस्ताव मंजूर केले आहेत. यापैकी किती प्रस्ताव व्यवहार्य ठरणार हे पुढील काळात स्पष्ट होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com