

पुणे, ता. ९ : गणेशोत्सवाच्या काळात दर्शनासाठी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता, मेट्रो प्रशासनाने १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी मेट्रो धावेल. गौरी आवाहनानंतर मेट्रो सेवा मध्यरात्री दोनपर्यंत उपलब्ध असेल. तर, अनंत चतुर्दशीला विसर्जन मिरवणुकीसाठी सलग ४१ तास अखंड मेट्रो सेवा सुरू राहणार आहे. यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
असे असेल मेट्रोचे विशेष वेळापत्रक :
- १४ ते १६ सप्टेंबर (गणेश चतुर्थी ते बुधवार) : सकाळी ६ ते रात्री ११ (नियमित सेवा).
- १७ ते २४ सप्टेंबर (गौरी आवाहन ते विसर्जनाच्या आधीचा दिवस) : सकाळी ६ ते मध्यरात्री २ पर्यंत सेवा सुरू राहील.
- २५ ते २६ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी व विसर्जन मिरवणूक) : २५ सप्टेंबरला सकाळी ६ पासून ते सलग २६ सप्टेंबरच्या रात्री ११ पर्यंत (एकूण ४१ तास) मेट्रो विनाव्यत्यय धावेल.
- २७ सप्टेंबरपासून : मेट्रोची सेवा नियमित वेळेनुसार सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत सुरू राहणार आहे.
गर्दी टाळण्यासाठी ‘या’ स्थानकांचा वापर करा :
प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा आणि स्थानकांवर चेंगराचेंगरी किंवा गर्दी होऊ नये, यासाठी पुणे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे.
- मार्गिका १ (पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट) : पेठ भागातील गणपतींच्या दर्शनासाठी प्रवाशांनी कसबा पेठ मेट्रो स्थानकावर उतरावे.
- मार्गिका २ (वनाज ते रामवाडी) : वनाजकडून येणाऱ्या प्रवाशांनी डेक्कन जिमखाना स्थानकाचा वापर करावा.
- रामवाडीकडून येणाऱ्या भाविकांनी पुणे महापालिका स्थानकावर किंवा छत्रपती संभाजी उद्यान स्थानकावर उतरावे.
- जिल्हा न्यायालय स्थानकावरील इंटरचेंज टाळा : भाविकांनी मार्गिका बदलण्यासाठी जिल्हा न्यायालय स्थानकात येऊन होणारी गर्दी टाळावी. आपापल्या मार्गावरील जवळच्या स्थानकांवरच उतरून पायी जाणे सोयीचे ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.