माण-हिंजवडी मेट्रोमुळे ‘कनेक्टिव्हिटी’ वाढणार

माण-हिंजवडी मेट्रोमुळे ‘कनेक्टिव्हिटी’ वाढणार
Published on: 

पिंपरी, ता. २ : माण- हिंजवडी ते शिवाजीनगर (पुणेरी मेट्रो) मेट्रोमुळे शहरातील पश्चिम पट्ट्यात, तसेच आयटी पार्क परिसरात मोठी ‘कनेक्टिव्हिटी’ वाढेल. त्यामुळे सामान्य नागरिकांसह आयटीयन्स, कामगार, नोकरदार, विद्यार्थ्यांना सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे.


मुंबई-बंगळूर महामार्ग (देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग) आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मेट्रोने जोडला जाणार आहे. शिवाय, कोल्‍हापूर, सांगली, सातारा आणि मुंबईकडून येणाऱ्या खासगी आणि राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा वाकड येथील भुजबळ चौकात थांबा आहे. याच ठिकाणी मेट्रोचे स्थानकही आहे. हेच स्थानक वाकडसह रावेत, किवळे, थेरगाव, पुनावळे, ताथवडे, जांबे, सांगवडे, मारुंजी, काळेवाडी या भागांनाही मेट्रोने जोडल्यामुळे प्रवाशांना जलद पर्याय उपलब्ध होणार आहे. परिणामी, रस्त्यांवरील अन्य वाहनांची वर्दळ कमी होऊन कोंडीतून सुटका होण्याची अपेक्षा आहे.

हिंजवडीत काम करणारे अभियंते, कर्मचाऱ्यांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मेट्रोमुळे त्यांच्या प्रवासाचा वेळ वाचेल. सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढेल. मात्र, मेट्रो स्थानकापासून कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी नियमित फीडर बस किंवा अन्य सुविधा उपलब्ध होणेही महत्त्वाचे आहे.
- उमेश चव्‍हाण, आयटीयन्‍स

तासाचा प्रवास मिनिटांवर
आयटी पार्कमध्‍ये सर्वसमावेशक अशा सुमारे ७०० कंपन्‍या, आस्‍थापना आहेत. त्‍यात अंदाजे साडेचार लाख कर्मचारी कार्यरत आहेत. दरम्‍यान, गर्दीच्या काळात साडेचार किलोमीटरसाठी ४५ ते ५० मिनिटांहून अधिक वेळ लागतो. मेट्रोमुळे तो ३० मिनिटांवर येऊ शकतो.

फायदा कोणाला व कसा?
- खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होईल
- रस्त्यांवरील वाहनांच्या रांगा कमी होतील
- आयटी पार्कच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचणे सोयीचे होईल
- वेळ व इंधन वाचेल, प्रदूषण कमी होईल
- पश्चिम पट्ट्यातील सार्वजनिक वाहतुकीचा सक्षम पर्याय
- हिंजवडी आयटी पार्कच्‍या शेवटच्‍या टोकापर्यंत सुखकर प्रवास
- शैक्षणिक संकुलांमुळे विद्यार्थांची सोय
- स्‍थानकांबाहेर सार्वजनिक वाहतूक व्‍यवस्‍थेसाठी स्‍वतंत्र पॉइंट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.