Pune Metro: पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो मार्गिका ३ च्या तिकीट दरांची घोषणा; ३ नोव्हेंबरला मोदींच्या हस्ते उद्घाटन

Pune Metro Line 3 Fare Structure Announced : हिंजवडी-शिवाजीनगर पुणे मेट्रो मार्गिकेचे ३ नोव्हेंबरला उद्घाटन होणार आहे. किमान तिकीट दर १२ रुपये, तर कमाल भाडे ६२ रुपये निश्चित करण्यात आले आहे.
Pune Metro Line 3 connecting Hinjewadi and Shivajinagar is set to begin passenger services from November 4, 2026, with 17 stations opening in the first phase

Pune Metro Line 3 connecting Hinjewadi and Shivajinagar is set to begin passenger services from November 4, 2026, with 17 stations opening in the first phase

esakal

Updated on: 

पुणे : पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका ३ च्या उद्घाटनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या मार्गिकेच्या प्रवासासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) तिकीट दरांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार प्रवाशांना किमान १२ रुपये, तर संपूर्ण मार्गावर प्रवास करण्यासाठी जास्तीत जास्त ६२ रुपये भाडे द्यावे लागणार आहे. जिल्हा न्यायालय ते माण असा संपूर्ण प्रवास केल्यास कमाल ६२ रुपये तिकीट दर निश्चित करण्यात आला आहे.

Loading content, please wait...