पुण्यातील मेट्रोची धाव आणखी वाढणार!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 January 2021

शिवाजीनगर-हडपसर येथील गाडीतळ ते सासवड असा आणखी एक मेट्रो मार्ग ‘पीएमआरडीए’कडून प्रस्तावित केला आहे. या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम दिल्ली मेट्रोकडून अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे शिवाजीनगरहून मेट्रोचा एक मार्ग लोणी काळभोरला, तर दुसरा मार्ग गाडीतळ येथून सासवड रेल्वे स्टेशनपर्यंत जाणार आहे.

पुणे - शिवाजीनगर-हडपसर येथील गाडीतळ ते सासवड असा आणखी एक मेट्रो मार्ग ‘पीएमआरडीए’कडून प्रस्तावित केला आहे. या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम दिल्ली मेट्रोकडून अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे शिवाजीनगरहून मेट्रोचा एक मार्ग लोणी काळभोरला, तर दुसरा मार्ग गाडीतळ येथून सासवड रेल्वे स्टेशनपर्यंत जाणार आहे.

‘पीएमआरडीए’ने हिंजवडी ते शिवाजीनगर असा मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. दरम्यान शिवाजीनगर पासून ही मेट्रो हडपसरला नेण्याची मागणी होत होती. त्यामुळे हिंजवडी-शिवाजीनगर-हडपसर-फुरसुंगीपर्यंत असा मेट्रो मार्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु मध्यंतरी पालकमंत्री अजित पवार यांनी ‘शिवाजीनगर ते फुरसुंगी येथील सुलभ गार्डनपर्यंत दर्शविण्यात आलेला मेट्रो मार्ग लोणी काळभोरपर्यंत वाढविण्यात यावा. दिल्ली मेट्रोने फुरसुंगीपर्यंतचा सादर केलेला अहवाल सुधारित करून तो पाठवावा,’ अशा सूचना ‘पीएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या नवीन मार्गाच्या सर्वेक्षणात ट्रॅफिक सर्व्हे महत्त्वाचा भाग आहे. वाहतूक सुरळीत झाल्यामुळे दिल्ली मेट्रोकडून या मार्गांच्या सर्वेक्षणाचे काम गतीने सुरू करण्यात आले असल्याचे ‘पीएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

शिवाजीनगर ते लोणीकाळभोर दरम्यानच्या मार्गाचे सर्वेक्षण करतानाच हडपसर येथील गाडीतळापासून सासवड रेल्वे स्टेशन या मार्गावरही दुसरा मेट्रो मार्ग प्रस्तावित करावा, असा निर्णय ‘पीएमआरडीए’ने घेतला होता. त्यानुसार हे कामही दिल्ली मेट्रोलाच देण्यात आले आहे. त्यामुळे दिल्ली मेट्रोकडून लवकरच शिवाजीनगर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड असे दोन मार्गांचे सर्वेक्षण करून अहवाल लवकरच सादर करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बहिणीशी प्रेमसंबंधाचा राग; पुण्यात 15 वर्षीय मुलावर कोयत्याने वार, आईलाही मारहाण

अंतर वाढले
शिवाजीनगर न्यायालयात ते फुरसुंगी दरम्यानच्या १५.५३ किलोमीटर लांबीचा हा मार्ग दर्शविला आहे. परंतु तो पुन्हा लोणी काळभोरपर्यंत पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे हा मार्ग आता वीस किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा मार्ग होणार आहे. या संपूर्ण मार्गावरून ५७ मेट्रोच्या कार धावण्याचे नियोजन असणार आहे. गाडीतळ ते सासवड दरम्यानचा मेट्रो मार्ग तीन किलोमीटर लांबीचा मार्ग असणार आहे. तो संपूर्ण ‘इलेव्हेटेड’ड असणार आहे.

किंमत एका मताची : नातवाला विजयी करून, आज्जीने घेतला जगाचा निरोप

प्रस्तावित मार्ग
शिवाजीनगर (कोर्ट)-रेल्वे कॉलनी-कलेक्‍टर ऑफिस, एमजी रोड-फॅशन स्ट्रीट-मंमादेवी चौक-रेसकोर्स-काळूबाई चौक-वैदूवाडी-हडपसर फाटा-हडपसर बस डेपो-ग्लायडिंग सेंटर-फुरसुंगी आयटी पार्क-सुलभ गार्डन असा मार्ग होता. तो आता सुलभ गार्डन येथून लोणीकाळभोरपर्यंत नेण्यात येणार असून त्या मार्गाचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Metro Route PMRDA