esakal | Pune: तांत्रिक बाबींनुसार मेट्रो स्थानकाबाबत निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे मेट्रो

पुणे : तांत्रिक बाबींनुसार मेट्रो स्थानकाबाबत निर्णय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धनकवडी : सातारा रस्त्यावरील स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या मेट्रो स्थानकांबाबत पाहणी सुरू आहे. नागरिकांच्या भावना आणि तांत्रिक बाबी लक्षात घेऊन स्थानकांबाबत निर्णय घेतला जाईल, असे महामेट्रोकडून गुरुवारी स्पष्ट करण्यात आले.

स्वारगेट ते कात्रज मेट्रो या मार्गात स्वारगेट, पद्मावती, कात्रज हे तीनच स्टेशन प्रस्तावित करण्यात आले आहेत. या मार्गावर पद्मावती ते कात्रज दरम्यान स्टेशन नसल्याने धनकवडी, बालाजीनगर आदी भागातील प्रवाशांची गैरसोय होणार आहे. या पार्श्वभूमीवर महामेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी या वाढीव स्टेशनबाबत तांत्रिक बाबी तपासून नागरिकांच्या दृष्टीने योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. सर्वेक्षण सुरू असून ते पूर्ण झाल्यावर स्थानकांबाबत निर्णय घेऊ, असे महामेट्रोचे प्रकल्प संचालक अतुल गाडगीळ यांनी सांगितले.

हेही वाचा: जिल्हा दूध संघाचा ठराव बेकायदा : चांभारे

मेट्रोच्या आराखड्यात अजूनही बदल होणे शक्य आहे. त्यामुळे स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावर भारती विद्यापीठ किंवा बालाजीनगर स्टेशनचा अंतर्भाव नवीन प्रस्तावित डीपीआरमध्ये होऊ शकतो. याचा पाठपुरावा सुरू आहे, असे नगरसेवक विशाल तांबे यांनी सांगितले.

लाखाहून अधिक प्रवाशांची ये-जा

धनकवडी, बालाजीनगर, भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार परिसरात ४ लाखांहून अधिक नागरिकांचे वास्तव्य आहे, तर लाखाहून अधिक प्रवाशांची ये-जा परिसरात भारती विद्यापीठ, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय, कात्रज डेअरी अशा ठिकाणांहून होते. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी बालाजीनगर परिसरात मेट्रो स्टेशन करण्याची मागणी होत आहे.

loading image
go to top