पुण्यात मेट्रोच्या तिकिटासाठी आता रांगेत थांबण्याची गरज नाही! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

digital keyoax machine

महामेट्रोने शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो स्थानकांवर तिकीट खरेदीसाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

पुण्यात मेट्रोच्या तिकिटासाठी आता रांगेत थांबण्याची गरज नाही!

पुणे - प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठी महामेट्रोने गेल्या आठवड्यात शहरातील स्थानकांमध्ये १२ डिजिटल किऑस्क बसविले आहेत. त्यातून गुगल- पे चा वापर करूनही तिकिट खरेदी करता येईल.

महामेट्रोने शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो स्थानकांवर तिकीट खरेदीसाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. डिजिटल कियॉस्क हे स्वयंचलीत आहे. त्यावरील क्यू-आर कोड करून प्रवासी तिकिट घेऊ शकतात. प्रवाशांनी त्यांच्या प्रवासाचे तपशील नमूद केल्यावर त्यांना पेमेंट झाल्यावर प्रवासाचे तिकिट उपलब्ध होईल. नजीकच्या काळात प्रवासी बँकेच्या डेबिट कार्डने देखील पेमेंट करून तिकिट खरेदी करू शकतील. डिजिटल किऑस्कमध्ये तिकिट घेण्यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये सूचना असलेली टच स्क्रीन सुविधा आहे.

तिकीट खरेदी करण्यासाठी प्रवासी एटीएमच्या धर्तीवर डिजीटल किऑस्क सहज हाताळू शकतात. डिजिटल किओस्कमध्ये प्रत्यक्ष तिकिटे, तसेच डिजिटल तिकिटे (व्हॉट्सअॅपवरून तिकिटे) मिळू शकतात. या शिवाय प्रत्येक स्थानकावर तिकिट खिडकी असेल. तेथूनही प्रवासी तिकिट खरेदी करू शकतात. तसेच पुणे मेट्रोच्या ॲपवरूनही प्रवाशांना तिकिट खरेदी शक्य आहे. ‘या किऑस्कमुळे प्रवाशांना मेट्रो प्रवासाचे तिकिट आता सहज उपलब्ध आहे. पुण्यातील मेट्रो शिवाजीनग न्यायालयापर्यंत आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रोही लवकरच शिवाजीनगर न्यायालयापर्यंत धावणार आहे,’ असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी नमूद केले.

टॅग्स :puneMetroticket