Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Pune Metro Tunnel Damage Case: ही घटना १४ मार्चला दुपारी पाऊणच्या सुमारास शुक्रवार पेठेत घडली होती. खडक पोलिस ठाण्यासमोर छत्रपती शिवाजी रस्त्यावर असलेला जुना वाडा पाडून त्या ठिकाणी मोकळ्या जागेत बोअरवेल खोदण्यात आली.
Drilling Punches Hole in Tunnel

Drilling Punches Hole in Tunnel

esakal

Updated on

Pune Latest News: घरासाठी बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला छिद्र पाडल्याप्रकरणी घरमालक आणि ठेकेदाराचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळला. हा गुन्हा सार्वजनिक मालमत्ता आणि मोठ्या प्रमाणावर सुरक्षेशी संबंधित असून, त्याचे स्वरुप, आरोपींविरोधातील प्रथमदर्शनी पुरावे आणि शिक्षेची तरतूद लक्षात घेत सत्र न्यायाधीश आर. आर. मेंढे यांच्या न्यायालयाने दोघांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com