

Pune Metro Water Leak Video Goes Viral After Heavy Rain, Safety Concerns Raised
esakal
पुणेकरांची लाईफलाईन ठरू पाहणाऱ्या पुणे मेट्रोच्या कामाचा दर्जा आता संशयाच्या भोऱ्यात सापडला आहे. कारण चक्क मेट्रोमध्ये पाणी गळती सुरू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पाणी गळतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागलं आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या या प्रकल्पाची पहिल्याच पावसात ही अवस्था झाल्यानं, मेट्रो प्रशासनाच्या कामावर आता पुणेकरांमधून सडकून टीका केली जात आहे.