
पुणे - खराडी ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ, कात्रज ते हिंजवडी मेट्रो या मार्गांवर मेट्रो मार्ग सुरू करण्यासाठी सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याची सूचना हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका आणि महामेट्रोला केली आहे. त्यानुसार महापालिका ‘डीपीआर’ तयार करून केंद्र सरकारमार्फत राज्य सरकारला पाठविणार आहे. खराडी येथे ‘मल्टिमोड्यूल ट्रान्स्पोर्ट हब’ आणि भुसारी कॉलनीजवळही दुमजली उड्डाण पूल उभारता येतील का, याची चाचपणी करण्यास महापालिकेला सूचना करण्यात आली आहे.