
Pune MHADA: म्हाडाला बिल्डरनं फसवलं! भूमी कन्स्ट्रक्शनच्या पंकज येवलांची तुरुंगात रवानगी
पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) आणि आर्थिक गैरव्यवहार करुन लाभार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याची येरवडा तुरुंगात रवानगी झाली आहे. (Pune MHADA was cheated by builder Bhumi Construction Pankaj Yewal sent to jail)
भूमी कन्स्ट्रक्शनचे पंकज प्रकाश येवला असं गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचं नाव आहे. याप्रकरणी म्हाडाचे मिळकत व्यवस्थापक विजय शंकर ठाकूर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बिल्डरला अटक करून त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
बिल्डरनं 31 मार्च 2022च्या अगोदर सदनिकेचा ताबा देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण बिल्डरनं याप्रकरणी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळं लाभार्थ्यांनी सदनिकेचा ताबा मिळत नसल्यामुळं उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर म्हाडानं संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.