पुणे : एमएनजीएल गॅस बिल अद्ययावत करण्याच्या बहाण्याने एका महिला वकिलाची चार लाख ९८ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे..या प्रकरणी महिलेने (वय ४९, रा. हिमाली सोसायटी, एरंडवणे) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संबंधित मोबाईल आणि बॅंक खातेधारकाविरुध्द माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेस अज्ञात मोबाईल क्रमांकावरून एमएनजीएल गॅस बिल अपडेट करण्याचा संदेश आला. त्यानंतर सायबर चोरट्याने त्यांच्याशी संपर्क साधून मोबाईलवर एक एपीके फाईल पाठवली. फिर्यादींनी ती फाईल डाऊनलोड करताच चोरट्याने त्यांच्या मोबाइलचा ॲक्सेस मिळवला. काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून चार लाख ९८ हजार रुपये परस्पर दुसऱ्या खात्यात वर्ग करून ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणाचा पुढील तपास अलंकार पोलिस करत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.