
पुणे महानगरपालिका आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर नगर रस्ता परिसरातही अतिक्रमण कारवाईने जोर धरला आहे. परिमंडळ एक अंतर्गत असलेल्या तिन्ही क्षेत्रीय कार्यालयांनी मिळून कारवाईचा धडाका लावला आहे. सलग सुरू असलेल्या कारवाईत तीन दिवसात 200 हून अधिक अनाधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे.
नगर रस्ता परिसरातील मंत्री मार्केट, खराडी बायपास येथील 102 अनाधिकृत इतक्या हातगाडी, स्टॉल, काउंटर, झोपड्या इत्यादी अनधिकृत व्यवसायिकांवर कारवाई करण्यात आली.