प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रूपडे पालटले

प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रूपडे पालटले
Published on

पुणे, ता. ११ : ‘‘जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्यातील ४५ ‘मॉडेल पीएचसी’चे (प्राथमिक आरोग्य केंद्र) रूपडे पालटले आहे. भौतिक सुविधा व आधुनिक उपचारांमुळे ही आरोग्य केंद्र नागरिकांना सेवा देण्यासाठी तत्पर असतील,’’ असा विश्वास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सोमवारी व्यक्त केला.

आरोग्य केंद्रांच्या उद्‍घाटनांसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे उपस्थित होते. औद्योगिक क्षेत्राच्या सामाजिक जबाबदारी (सीएसआर) आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून या कामांसाठी ६८ कोटी रुपयांचा खर्च आला असून, २९ केंद्रांमध्ये अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष केले आहेत. येत्या गुरुवारी (ता. १४) बारामतीमधील होळ येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये ४५ केंद्रांचे आॅनलाइन उद्‍घाटन होणार आहे.

जगदाळे म्हणाले, ‘‘प्राथमिक आरोग्य केंद्र ही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सरकारची पहिली आणि मूलभूत आरोग्य सेवा यंत्रणा मानली जाते. प्राथमिक उपचार, लसीकरण, संसर्गजन्य रोग नियंत्रण, तपासण्या, औषधोपचार आणि जनजागृती यांसारख्या सेवा या केंद्रांमधून दिल्या जातात. मात्र, अनेक जुन्या केंद्रांमध्ये मर्यादित सुविधा, अपुरी जागा आणि जीर्ण इमारतींच्या समस्या होत्या. त्यामुळे मॉडेल पीएचसी संकल्पनेतून पारंपरिक प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आधुनिक, सुसज्ज आणि नागरिकाभिमुख रूप विकसित करण्यात येत आहे. या केंद्रांमध्ये डिजिटल नोंदणी व्यवस्था, प्रयोगशाळा तपासणी सुविधा, आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि अधिक सक्षम उपचार पद्धती उपलब्ध करून देण्यात येत आहेत.’’

जगदाळे म्हणाले...
- ११० पैकी ८० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ‘सावित्री कॅफे’ सुरू होणार
- रुग्ण, नातेवाइकांना कॅफेचा फायदा होईल, शिवाय बचत गटातील महिलांना रोजगार मिळणार
- मॉडेल पीएचसीच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी ३७ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे नियोजन
- प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची भेटींचे नियोजन केले जाणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com