

IMD Yellow Alert Pune
esakal
Pune Latest News: शहरात रविवारी पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर सोमवारी विश्रांती घेतली. मात्र सोमवारी (ता. २२) मॉन्सून अधिकृतरीत्या पुण्यात दाखल झाला आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस शहरासह जिल्ह्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. दरम्यान पुणे जिल्ह्याला पुढील चार दिवसांसाठी ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. परिणामी उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.