Khadakwasla dam rainfall and water level update
esakal
खडकवासला : पुणे जिल्ह्यात यंदाचा मान्सून अनेक भागांसाठी दिलासादायक ठरत आहे. पावसाच्या नोंदीनुसार आज रविवार १२ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह मैदानी भागातील अनेक ठिकाणी मागील वर्षाच्या तुलनेत अधिक पाऊस झाला (Khadakwasla dam rainfall and water level update) आहे. विशेषतः मुळशी, पवना आणि खडकवासला परिसरात यंदाची पर्जन्यनोंद मागील वर्षापेक्षा अधिक असून, त्यामुळे धरणांतील जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.