पुण्यात कोरोना मृतांमध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांचे मृत्यू अधिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patients

कोरोनामुळे पुण्यात सहा हजार ६५ पुरुषांचा मृत्यू झाला, त्यातही वयाची साठी ओलांडलेल्या ६५ टक्के (तीन हजार ९२५) नागरिकांचा समावेश आहे.

पुण्यात कोरोना मृतांमध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांचे मृत्यू अधिक

पुणे - कोरोनामुळे (Corona) पुण्यात (Pune) सहा हजार ६५ पुरुषांचा मृत्यू (Man Death) झाला, त्यातही वयाची साठी ओलांडलेल्या ६५ टक्के (तीन हजार ९२५) नागरिकांचा समावेश आहे. या साथीच्या उद्रेकात मृत्युमुखी पडणाऱ्या स्त्रियांचे (Women) प्रमाण तीन हजार २८३ (३५ टक्के) आहे. शहरात ९ मार्च २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. शिवाय, त्याचवर्षी ३० मार्चला कोरोनाच्या पहिल्या रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. गेल्या दोन वर्षांमध्ये शहरात नऊ हजार ३४८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्याचे लिंग, वयोगट आणि रुग्णाच्या मृत्यूमागचे नेमके कारण काय, या आधारावर महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे विश्लेषण करण्यात आले. त्यातून हा निष्कर्ष पुढे आला आहे.

सहव्याधींमुळे मृत्यूत वाढ

  • शहरात कोरोनाचा संसर्ग झाल्याने ९,३४८ पैकी ३,१०८ (३३ टक्के) रुग्णांचा मृत्यू; त्यात २,०२३ पुरुष आणि १,०८५ स्त्रिया

  • उच्च रक्तदाब, मधुमेह अशा वेगवेगळ्या सहव्याधी असलेल्या रुग्णावर उपचार करण्यास मर्यादा, परिणामी संसर्ग झालेल्या २,०७० (२९ टक्के) रुग्णांचा मृत्यू; त्यात १,६८१ पुरुष व १,०२६ स्त्रिया

  • उच्च रक्तदाब, मधुमेह, मूत्रपिंड, हृदयविकार, ‘मल्टिपल ऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोम’ अशा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण एक ते सात टक्क्यांच्या दरम्यान

  • शहरात कोरोनाचा मृत्यू झालेल्यांपैकी ६,२४१ (६७ टक्के) रुग्णांना वेगवेगळ्या सहव्याधी

वयाच्या साठीनंतर ६५ टक्के मृत्यू

  • वीस वर्षाआतील १० मुलांचा, तर १५ मुलींचा मृत्यू; उर्वरित सर्व वयोगटात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमधील कोरोनाच्या मृतांची संख्या कमी

  • ६० वर्षांनंतर ६,०३७ रुग्णांचा मृत्यू; त्यात ३,९२५ पुरुष आणि २,११२ स्त्रिया

  • ६० वर्ष ओलांडलेल्या ४,१२१ (६८ टक्के) रुग्णांना सहव्याधी, त्यामुळे त्यांच्यावर उपचारांना मर्यादा आल्या

  • सहव्याधी असलेल्या स्त्रियांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी

सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे दिसते. पाचपेक्षा जास्त दिवस उपचारांसाठी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्याचे दिसते. त्यामुळे उशिरा निदान आणि उपचारांना उशिरा सुरुवात करणे, हे अशा रुग्णांच्या मृत्यूचे एक प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट होते.

- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

Web Title: Pune More Men Than Women Die In Corona Deaths

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..