Motivation Story : अवघ्या अकरा वर्षांचा अर्हम झाला ‘शेफ’!

उन्हाळ्याची सुटी म्हटलं की लहान मुलं उन्हाळी शिबिरं, भटकंती, मौजमस्ती करण्यात रममाण असतात. परंतु अवघ्या अकरा वर्षांच्या अर्हमच्या डोक्यात मात्र वेगळंच काही तरी सुरू होतं.
Arham nahar
Arham naharsakal

पुणे - उन्हाळ्याची सुटी म्हटलं की लहान मुलं उन्हाळी शिबिरं, भटकंती, मौजमस्ती करण्यात रममाण असतात. परंतु अवघ्या अकरा वर्षांच्या अर्हमच्या डोक्यात मात्र वेगळंच काही तरी सुरू होतं. त्याने या उन्हाळ्याच्या सुटीत चक्क आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर आजमावून पाहिलंय. आश्चर्य वाटतंय!! अहो, पण हे खरे आहे.

स्वयंपाकाची आवड असणारा हा मुलगा विविध पाककृतींचा आपापल्यापरीने आविष्कार करण्यात मग्न आहे. बरं एवढंच नव्हे, तर त्याने चक्क प्रदर्शनात आपला ‘फूड स्टॉल’ही लावला अन् त्यात यशस्वीही झाला. अर्हम नहार सेनापती बापट रस्ता येथील विखे पाटील मेमोरिअल स्कूलचा हा विद्यार्थी. नुकताच तो सहावीत गेलाय. तो साधारतण: तिसरीत असताना कोरोनाचे संकट ओढावले.

Arham nahar
Patas Crime : खंडणीच्या आरोपाखाली दोन पत्रकारांना अटक; पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न

या काळात शिक्षणही घरातून सुरू होते, तसेच अर्हम याची आई निवेदिता व्यवसायाने कापड व्यावसायिक. परंतु त्याही कोरोना काळात घरात होत्या. त्या म्हणाल्या, ‘एरवी आमच्याकडे कूक स्वयंपाक बनवायचा. परंतु कोरोना काळात कूक येणे बंद होते. म्हणून मी स्वतः स्वयंपाक बनवायचे. त्यावेळी जेवण बनवताना त्याच्या खमंग वासावरून अर्हम पदार्थ कसा झालाय, त्यात काय कमी-जास्त आहे हे बिनचूक ओळखायचा. त्यानंतर हळू हळू तो स्वयंपाकघरात येऊन मदत करू लागला. असे करताना तो एक-एक पदार्थ बनवायला शिकला.’

त्याच्या या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात नुकत्याच झालेल्या एका प्रदशर्नात त्याला पालकांनी फूड स्टॉल टाकून दिला. अवघ्या ११ वर्षांच्या या मुलाने स्वतःच्या कष्टाने प्रदर्शनाचे सर्व दिवस सकाळी ११ ते रात्री ९ या वेळात आपला स्टॉल सुरू ठेवला. त्यासाठी तो भल्या पहाटे उठून पूर्व तयारी करायचा, असा अनुभवही निवेदिता यांनी सांगितला.

आनंद नवीन उत्साह देणारा

पहिल्या प्रयत्नातील या फूड स्टॉलमधून सर्व खर्च वगळून त्याने अवघ्या २० ते २५ हजार रुपयांची कमाई उन्हाळ्याच्या सुट्टीत केली. अर्थात, आर्थिक कमाई हा मुद्दा जरी गौण धरला तरी पाककृतीत निपुण असलेल्या अर्हमने खाद्यप्रेमींना आपल्या हातखंडा असलेले पदार्थ बनवून खायला घातले. यातून मिळालेला आनंद त्याला नवीन उत्साह देणारा ठरला.

लॉकडाउनमध्ये आईकडे पाहून मी पदार्थ बनवायला शिकलो. मसाला पाव, पाव भाजी हे मला खूप छान येते. त्याशिवाय छोले-भटोरे, जिलेबी यांसह वेगवेगळे खाद्यपदार्थ मी बनवितो. तिसरीत असल्यापासून स्वयंपाक बनविण्यास सुरवात केली. कुकिंग खूप आवडत असल्याने यात मी करिअर देखील करू शकतो. त्यासोबत मला खगोलशास्त्राची देखील आवड आहे. त्यामुळे या दोन्हीपैकी एक क्षेत्र करियरसाठी निवडेल, असे मला वाटतंय.

- अर्हम नहार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com