Pune: ७१६८ पदांचे मागणीपत्र लोकसेवा आयोगास प्राप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

७१६८ पदांचे मागणीपत्र लोकसेवा आयोगास प्राप्त

पुणे : ७१६८ पदांचे मागणीपत्र लोकसेवा आयोगास प्राप्त

पुणे : राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग यासह विविध विभागांमधून १५५११ पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. ७१६८ पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास प्राप्त झाले आहे. तसेच लवकर एमपीएससी विद्यार्थ्यांना एक वर्षाची संधी वाढवून दिल्याचे परिपत्रक निघणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

विद्यानिकेतन ॲकॅडमी आयोजित एमपीएससी विद्यार्थ्यांच्या चर्चासत्रात ते बोलत होते. मंदार नागरगोजे, सचिन वणवे, अभिजीत जगताप, कुशल देशपांडे, महादेव गिरी, संदीप वणवे यांच्यासह एमपीएससी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी भरणे यांचा सत्कार केला. तसेच परीक्षा देत असताना येणाऱ्या समस्या विद्यार्थ्यांनी मांडल्या. विद्यानिकेतन ॲकॅडमीचे प्रा. वैजनाथ धेंडुळे लिखीत,'मराठी व्याकरण व शब्दसंग्रह,'पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

हेही वाचा: पर्यटन स्थळावरील गर्दी थांबविण्यासाठी कंट्रोल ट्युरिझमची आवश्‍यकता

भरणे म्हणाले, “गट-अ संवर्गातील ४४१७ , गट-ब संवर्गातील ८०३१ आणि गट क संवर्गातील ३०६३ अश्या एकूण १५५११ पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यातील गट-अ २८२७ , गट - ब २६४१ व गट- क १७०० अशी एकूण ७१६८ पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास प्राप्त झाले आहे. तसेच आयोगाच्या अध्यक्षांच्या नियुक्तीची कार्यवाही अंतिम टप्प्यामध्ये आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी कायम प्रयत्नशील असून अनेक कामांचा पाठपुरावा मी स्वतः करत आहे.”

विद्यार्थ्यांनी आयुष्यात न्यूनगंड कधीही बाळगू नये. मला हे जमेलका हा विचार करण्यापेक्षा मी ते करणार असा सकारात्मक विचार करा. अधिकारी झाल्यावर ज्याला गरज आहे त्याला मदत करा तुम्हाला तो व्यक्ती विसणार नाही. गोरगरिबांना केंद्र बिंदू मानून काम करत रहा. आयुष्यात छोट्या छोट्या संधी येतात. त्याचे सोने कारणासाठी प्रयत्न करावेत.

संधी दवडू नका सातत्याने लोकांना मदत करत रहा. त्याचा तुम्हाला मोठा फायदा होईल असेही भरणे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मनोज पवार यांनी केले तर आभार संदीप वणवे यांनी मानले.

loading image
go to top