MSRTC's Pune division plans to operate 1,200 additional buses to manage the Diwali travel rush.
esakal
पुणे : दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने १२०० जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. पुण्यातून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठी या बस उपलब्ध असतील. या माध्यमातून दररोज सुमारे एक लाख प्रवाशांची वाहतूक करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे.