Pune Crime News: वडगाव निंबाळकर, ता. १६ : होळ (ता. बारामती) येथील पियुष विजय भंडलकर या नऊ वर्षीय लहान मुलाचा वडिलांनी खून केल्याचे उघड झाले असून, गुन्हा लपवण्यासाठी घरातील सदस्यांनी मदत केल्याचेही पोलिस तपासात पुढे आले आहे. विजय गणेश भंडलकर, असे या निर्दयी वडिलांचे नाव असून, आरोपीची आई शालन गणेश भंडलकर व संतोष सोमनाथ भंडलकर (सर्व रा. होळ), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस अंमलदार सागर विलास चौधरी यांनी फिर्याद दिली.