Pune : मांजरीच्या मुळा-मुठा नदीवरील पूल जुलै अखेर होणार पूर्ण

सोलापूर महामार्ग ते नगर महामार्गाला जोडणारा हा जवळचा मार्ग असल्याने येथून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे.
Pune Mula-Mutha River bridge
Pune Mula-Mutha River bridgesakal

मांजरी : येथील वाघोली रस्त्याच्या मुळा-मुठा नदीवरील पुलाच्या कामाने गती घेतली आहे. पुलावरील छत टाकण्याचे काम सध्या सुरू असून येत्या जुलै अखेर काम पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.

छप्पन क्रमांकाचा जिल्हाप्रमुख मार्ग असलेल्या या रस्त्याचे पंधरानंबर ते मांजरी व पुढे वाघोली पर्यंतच्या सुमारे दहा किलोमीटरच्या रस्त्याचे दोन्ही मांजरी हद्दीतील काही भाग वगळता काँक्रिटीकरणचे काम पूर्ण झाले आहे.

सोलापूर महामार्ग ते नगर महामार्गाला जोडणारा हा जवळचा मार्ग असल्याने येथून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. मांजरी रेल्वे उड्डाणपूल खुला झाल्यास या रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. नदीवर असलेला सध्याचा पूल हा सबमर्सिबल असल्याने भविष्यात वाढणाऱ्या वाहतुकीला तो न्याय देऊ शकणार नाही. त्यामुळे नदीवर नव्याने सुरू असलेल्या पुलाची प्रतीक्षा प्रवासी व स्थानिक नागरिकांना आहे.

नोव्हेंबर २०२१ मध्ये या नदीवरील पुलाचे काम सुरू झाले आहे. पुलाची लांबी २२० मीटर तर रुंदी सुमारे साडेनऊ मीटर आहे. हा पूल पादचारी मार्गासह तीन पदरी आहे. सध्या पुलाच्या कामाने वेग घेतला असून छत टाकण्याचे काम सुरू आहे. पुलाच्या नऊही फाउंडेशनचे काम पूर्ण झाले आहे. त्यावर पडणाऱ्या आठ स्लॅब पैकी पाच स्लॅब टाकून झाले आहेत. महिना दीड महिन्यात पुढील तीनही स्लॅब टाकले जाणार आहेत.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com