

Sewage treatment plants under construction as part of Pune's Mula-Mutha river pollution control project.
esakal
पुणे : मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पांतर्गत (परम प्रकल्प) सुरू असलेल्या ११ पैकी नऊ सांडपाणी शुद्धीकरण केंद्रांची (एसटीपी) कामे डिसेंबरअखेर पूर्ण होऊन ती कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुळा-मुठा नदीच्या प्रदूषणाला काही प्रमाणात अटकाव करण्यास महापालिकेला मदत होणार आहे. उर्वरित दोन केंद्रांची कामे पूर्ण होण्यास आणखी काही महिने विलंब होणार असल्याची चिन्हे आहेत.