Pune-Mumbai Express: आरक्षित गाड्यांसाठी सीझन पास नाहीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune-Mumbai Express

Pune-Mumbai Express: आरक्षित गाड्यांसाठी सीझन पास नाहीच

पुणे : कोरोनाचा प्रार्दुभाव ओसरताच रेल्वे सेवा टप्याटप्याने पूर्वपदावर येत आहे. आरक्षित तिकिटासह अनेक रेल्वे गाड्या आता मार्गावर धावू लागल्या आहेत. त्यामुळे मेल, एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना पूर्वीप्रमाणे सुरू असलेली मासिक सीझन पासची सेवा सुरू करण्याची मागणी प्रवासी गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत. यावर मध्य रेल्वेच्या वाणिज्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रात स्पष्टपणे ही सेवा आरक्षित रेल्वे गाड्यांसाठी सुरू नसल्याचे जाहीर केले आहे. (Pune-Mumbai Express Pass Updates)

विभागाच्या पत्राचा सर्वच गाड्यांना मासिक सीझन पास सुविधा दिली जाणार असा अर्थ काढला जात आहे. मात्र सीझन पासची सेवा ही फक्त डेमू आणि लोकल रेल्वे गाड्यांसाठी सुरूच करायची आहे. तसेच ज्या भागात ही सेवा देली जात नाही. त्या भागात याची अंमलबजावणी करायची आहे. मात्र पुण्यात ही सेवा काही दिवसांपासूनच सुरु आहे. त्यामुळे या पत्रात नवीन असे काही नाही. पुणे- सातारा आणि पुणे- कोल्हापूर या रेल्वे डेमू गाड्यांसाठी मासिक सीझन सेवा सुरू केली नव्हती. त्या गाड्यांसाठी आता ही सेवा सुरु केली जाणार आहे.

हेही वाचा: खाणे नको, पाणी नको...आम्हाला युक्रेनमधून बाहेर काढा; विद्यार्थ्यांच्या भावना

पुणे-मुंबई मेल एक्स्प्रेस रेल्वे गाडी आरक्षित आहे. त्यामुळे या गाडीला सीझन पास सुविधा नाही. आदेश आल्यानंतर ही सेवा दिली जाईल. ज्या प्रवाशांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत. त्यांनाच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. असे पुणे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले.

मध्य रेल्वे पुण्यातील प्रवाशांबाबत दुजाभाव करत आहे. सर्व सेवा सुरळीत होत असूनही सीझन पास का दिला जात नाही? नाशिक-मुंबई पंचवटी या एक्स्प्रेस रेल्वे गाडीला सीझन पास दिला जातो, मात्र पुणे-मुंबई मेल एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना नाकारला जातो, हा कसला न्याय आहे? रेल्वेने जनरल गाड्यांना एक्स्प्रेसचा दर्जा दिला आहे. रेल्वेने पुणे-मुंबई मार्गावर कोणती जनरल रेल्वे धावते, हे कागदपत्रांनी दाखवून द्यावे. विनाकारण प्रवाशांना वेठीस धरले जात आहे. रेल्वेने तत्काळ मेल, एक्स्‍प्रेस गाड्यांना सीझन पास सुरू करावा.

- हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप

Web Title: Pune Mumbai Express Train Season Pass Updates

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..