Pune Mumbai Express Way
sakal
पुणे
Pune Mumbai Express Way: मिसिंग लिंक लवकरच सुरू होणार, तारीख आली समोर; वेळ वाचणार
Real-time monitoring in control rooms: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ एक मेपासून वाहतुकीसाठी खुली होणार असून, बोगद्यात ज्वलनशील वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
प्रसाद कानडे
पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे काम पूर्णत्वास येत असून, एक मेपासून वाहतुकीसाठी खुला होत आहे. यामुळे घाटमाथ्यावरील वाहतूक कोंडी टळेल. शिवाय प्रवासाचा वेळ २० ते २५ मिनिटांनी कमी होईल. मात्र, प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देत बोगद्यातून ज्वलनशील, अतिज्वलनशील इंधनाची व घातक रसायनांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना बोगद्यात प्रवेश नसेल.

