
देहूरोड, ता. ३ : देहूरोड छावणी हद्दीतील सेंट्रल चौकात बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ट्रक बंद पडल्याने महामार्गावर वाहनांची मोठी रांग लागली होती. सुमारे एक किलोमीटरपर्यंत वाहने अडकून पडली होती. त्यामुळे जुना पुणे-मुंबई महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.