पुणे : मुंढव्यातील गतिरोधक देताहेत अपघाताला आमंत्रण

वाहन चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे.
मुंढव्यातील गतिरोधक देताहेत अपघाताला आमंत्रण
मुंढव्यातील गतिरोधक देताहेत अपघाताला आमंत्रणsakal
Updated on

मुंढवा : मुंढवा येथील पिंगळेवस्ती ते महात्मा गांधी चौकादरम्यान रस्त्यावरील वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी बसविलेल्या गतिरोधकाचे ब्लॉक उखडून लोखंडी पट्ट्या बाहेर आल्या असून, त्या दुचाकी वाहनांना अडथळा ठरत आहे. येथून वाहन चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. पथविभागाने लवकर दुरूस्ती करावी अशी मागणी येथील युवकांनी केली आहे.

मुंढवा-पिंगळेवस्ती रोडवरील पासपोर्ट कार्यालय, कचरे वस्ती, सर्वोदय कॉलनी, लाल माडी चौक, महात्मा गांधी चौकात पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी व वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी गतिरोधक उभारले आहेत. गतिरोधक तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले कॉंक्रीटचे ब्लॉक काही ठिकाणी उखडले तर काही ठिखाणी खचल्याने, लोखंडी पट्ट्या वर आल्या आहेत. त्यामुळे येथून जाणाऱ्या चालकाच्या लक्षात ही बाब येत नाही. त्यामुळे लहान व कमी उंचीच्या वाहनांचे यामुळे नुकसान होत आहे. दुचाकी व चारचाकी वाहनात पट्टी अडकून अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

मुंढव्यातील गतिरोधक देताहेत अपघाताला आमंत्रण
रोहितचा विराटवर निशाणा?; म्हणाला, "हे आधीच करायला हवं होतं"

चालकांच्या प्रतिक्रीया

सुरजकुमार शर्माः- गतिरोधकावरील पट्ट्या वर आल्याने, व ब्लॉक खचल्याने खड्ड्यावरून जातांना वाहन आदळते. ऐनवेळी ब्रेक लावल्याने मागून आलेले वाहन धडकून अपघात होत आहेत. दरम्यान, या रस्त्यावरील गतिरोधकांजवळ पांढरे पट्टे मारलेले नाहीत. पालिकेने या रस्त्यावरील गतिरोधकांवर, झेब्रा क्रॉसिंगवर व साईडपट्टीला पांढऱ्या रंगाचे पट्टे मारावेत. त्यामुळे होणारे अपघात टळतील.

सुदेश गायकवाडः-(रिक्शा चालक) महात्मा फुले चौक ते पिंगळे वस्ती दरम्यानच्या रस्त्यावर गतिरोधकांसाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी पट्या व ब्लॉक झिजल्याने, वाहन त्यावर आदळते. त्यामुळे आम्हाला मोठी कसरत करावी लागत आहे. रिक्षातून जाणाऱ्या ज्येष्ठांना व गर्भवती महिलांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. भविष्यात येथे होणारी मोठी दुर्घटना टाळण्यासाठी गतिरोधकांची दुरूस्ती करावी.

हडपसर क्षेत्रिय कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता शैलेश क्षिरसागर म्हणाले, या रस्त्यावरील गतिरोधकावरील निघालेल्या लोखंडी पट्ट्यांच्या आजूबाजूला डांबर टाकून बुजवून घेण्यास सांगतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com