

Mundhwa Govt Land Deal Controversy
Sakal
पुणे : मुंढवा येथील शासकीय जमीन खरेदीचा झालेला व्यवहार रद्द करण्याची तयारी अमेडिया एंटरप्रायझेस कंपनीने दाखविली असली, तरी या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. या व्यवहाराचा दस्त रद्द (कॅन्सल डिड) करण्यासाठी खरेदीदार आणि विक्री करणारे अशा दोघांना समक्ष हजर राहावे लागणार आहे. त्यासाठी या प्रकरणातील शीतल तेजवानी समक्ष हजर राहणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.