पुणे महापालिकेचा उद्या अर्थसंकल्प

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 जानेवारी 2020

उत्पन्नातील घट, नव्या प्रकल्पांची लांबलचक यादी, त्यासाठीचा निधी आणि उत्पन्नाच्या नव्या स्रोतांचा वाणवा या पार्श्‍वभूमीवर नवे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड येत्या सोमवारी (ता. २७) महापालिकेचा २०२०-२१चा अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात पुणेकरांच्या नेमक्‍या कोणत्या अपेक्षांना प्राधान्य राहील, याची उत्सुकता आणि तिजोरीतील खडखडाट दूर करण्यासाठी कोणते उपाय सुचविले जातील, याकडे लक्ष लागले आहे.

पुणे - उत्पन्नातील घट, नव्या प्रकल्पांची लांबलचक यादी, त्यासाठीचा निधी आणि उत्पन्नाच्या नव्या स्रोतांचा वाणवा या पार्श्‍वभूमीवर नवे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड येत्या सोमवारी (ता. २७) महापालिकेचा २०२०-२१चा अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात पुणेकरांच्या नेमक्‍या कोणत्या अपेक्षांना प्राधान्य राहील, याची उत्सुकता आणि तिजोरीतील खडखडाट दूर करण्यासाठी कोणते उपाय सुचविले जातील, याकडे लक्ष लागले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सोमवारी सकाळी अकरा वाजता आयुक्त गायकवाड अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तत्कालीन आयुक्त सौरभ राव यांच्या सुचविलेल्या योजनांत वाढ करीत गेल्या वर्षी स्थायी समितीने ६ हजार ७६५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला. मात्र नोव्हेंबरअखेरचे उत्पन्न पाहता अर्थसकंल्पात सुमारे दोन ते सव्वादोन हजार कोटी रुपयांची घट येण्याची शक्‍यता आहे. त्याचा परिणाम, एवढ्याच रकमेच्या कामांवर होणार आहे. दुसरीकडे, पुणेकरांवर जादा कर न लादता उत्पन्न वाढविण्याची घोषणा स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी केली आहे.

त्यासाठी स्वतंत्र महसूल कक्षही स्थापन केला आहे. या पार्श्‍वभूमीवर नव्या अर्थसंकल्पात कोणत्या योजना राहणार आणि त्याकरिता निधीची जुळवाजुळव कशी करणार, याची उत्सुकता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Municipal Budget Tomorrow